ETV Bharat / state

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी शिवसेनेचे आंदोलन; 20 डिसेंबरपर्यंत दिली मुदत

मुंगोली कोळसा खदान (वेकोली) अंतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी प्रा. लिमिटेड कंपनीत स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात 'काम बंद आंदोलन' करण्यात आले.

yavatmal
शिवसेनेचे काम बंद आंदोलन
author img

By

Published : Dec 12, 2019, 11:39 AM IST

यवतमाळ - वेकोली अंतर्गत खासगी कंपनीमध्ये येथील स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा. एकूण कामगारांच्या ८० टक्के कामगार स्थानिक असावे या मागणीकरता शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. कंपनीने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आले. मात्र, स्थानिकांना असेच डावलले तर, हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे काम बंद आंदोलन

वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खदान (वेकोली) अंतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. येथील स्थानिकांना डावलून पर राज्यातील लोकांना रोजगार दिला जात आहे. त्यामुळे येथील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नावर कंपनीने लक्ष द्यावे, स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, या मागणीकरता शिवसेनेच्या वतीने 'काम बंद आंदोलन' करण्यात आले. तसेच, एकूण कामगारांच्या ८० टक्के कामगार स्थानिक असावे असा पवित्रा घेत शिवसेना आक्रमक झाली होती. या आंदोलनामुळे महालक्ष्मी कंपनीचे काम बऱ्याच वेळापर्यंत बंद होते. २० डिसेंबरपर्यंत स्थानिक रोजगारांना कामावर घेण्याचे आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा - देशभरात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा बट्ट्याबोळ, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसची तक्रार

हे आंदोलन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात आजूबाजूच्या परिसरातील शेकडो बेरोजगार युवक सहभागी झाले होते. यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषबाजी करून वेकोली प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या कंपनीने आश्वासन दिले असले तरी, याची पूर्ती न झाल्यास हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हेही वाचा - यवतमाळमध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम वृद्धास अटक

Intro:Body:यवतमाळ : वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खदान (वेकोली) अंतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी प्रा. लिमिटेड कंपनीत स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आजू बाजूच्या परिसरातील शेकडो बेरोजगार युवक सहभागी झाले होते. संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषबाजी करून वेकोली प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
या कंपनीमध्ये मनमानी पद्धतीने कारभार चालू असून स्थानिक बेरोजगारांना डावलून पर राज्यातील युवकांना रोजगार दिल्या जात आहे. त्यामुळे स्थानिकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. या कम्पनी मध्ये ऐकून कामगारांच्या 80 टक्के कामगार स्थानिक असावे. असा पवित्रा घेत शिवसेना आक्रमक झाली. आणि कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे महालक्ष्मी कंपनीचे काम बऱ्याच वेळा पर्यंत बंद होते. 20 डिसेंबरपर्यंत स्थानिक रोजगारांना कामावर घेण्याचे आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

बाईट - संजय निखाडे, उपजिल्हा प्रमुख
बाईट - लक्ष्मण घोंगे, स्थानिक बेरोजगार
बाईट - मुरारीसिंग, मॅनजर, महालक्ष्मी कंपनी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.