ETV Bharat / state

...म्हणून यवतमाळमध्ये संस्थाचालकाने दिव्यांग मुलाच्या हातात दिला 'टीसी'

शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देत त्यांना शिक्षणाचा हक्क प्रदान केला आहे. त्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना सोयीच्या शाळेत ज्ञानार्जनाचे धडे घेता यावे यासाठी विशेष सवलत पुरवण्यात येते.

...म्हणून यवतमाळमध्ये संस्थाचालकाने दिला दिव्यांग मुलाच्या हातात 'टीसी'
author img

By

Published : Jun 5, 2019, 2:08 PM IST

यवतमाळ - मारेगाव येथील नामवंत इंग्रजी माध्यम शाळेच्या संस्थाचालकाला एका पालकाने आपल्या दुसऱ्या मुलाच्या टीसीची मागणी केली. मात्र, संस्थाचालकाने त्या पालकाच्या दिव्यांग मुलाची टीसी त्यांच्या हातात देवून हाकलुन लावल्याचा त्या पालकाने केला आहे. त्यामुळे शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शिक्षणाधिकाऱयांकडे पालकानी दिले आहे. विद्यानिकेतन इंग्लीश मिडीअम असे त्या शाळेचे नाव आहे.

काय आहे प्रकरण -

मारेगाव शहरातील विद्यानिकेतन इंग्लीश मीडिअम स्कुलमध्ये येथील अनिल नामदेव बोंडे यांचे दोन मुले तेजस व नयन शिकत होते. चालु शैक्षणीक वर्षात तेजस हा आठव्या वर्गात गेल्याने त्याला पुढील शिक्षणासाठी सोयीच्या दृष्टिने इतरत्र पाठवण्याचे ठरवण्यात आले होते. तेजसच्या टीसीची रितसर मागणी करण्यात आली. मात्र, संस्थाचालकांचा राग अनावर होवून येथील संस्थाचालकाने चक्क दुसऱ्याही दिव्यांग असलेल्या नयनचा टीसी देवून पालकांना हाकलून लावल्याची तक्रार अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱयांकडे केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्याची नियबाह्य टीसी हातात दिल्याप्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना शिक्षणाचा हक्क प्रदान केला आहे. त्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना सोयीच्या शाळेत ज्ञानार्जनाचे धडे घेता यावे यासाठी विशेष सवलत पुरवण्यात येते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी शाळा बदलायची असल्यास संबंधित शाळेची मान्यता मिळवावी लागते. मात्र, येथील शाळेच्या अध्यक्षाने पुढील शाळेत प्रवेशासंबंधीचा दस्ताऐवज न मागता पहिल्या मुलाचा टीसी मागण्याच्या रागापोटी या दुसऱया दिव्यांग विद्यार्थ्याची टिसी दिल्याने दुसऱया शाळेत या दिव्यांग विद्यार्थ्याचा प्रवेश गैरसोयीचा झाला आहे. त्यामुळे त्याच्या पुढील शैक्षणिक सत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱया या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पीडित दिव्यांगच्या पालकाने केली आहे.

चौथ्या वर्गात शिकणाऱ्या नयन नावाच्या मुलाला शाळेच्या पटांगणात खेळत असताना शाळेच्या स्कूल बसने धडक देऊन तीन वर्षांपूर्वी अपघातग्रस्त केले होते. या अपघाताची तक्रार पोलिसात करू नये म्हणून पालकांना शाळेचे संस्थाचालक व प्राचार्य यांनी या विद्यार्थ्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देऊ, असे आश्वासन दिले होते. या अपघातामध्ये नयनला 53 टक्के अपंगत्व आले आहे. मात्र, आता मोठ्या मुलाची टीसी देताना या आश्वासनाचा विसर प्राचार्य व संस्थाचालक यांना पडला आहे. केवळ मोठ्या मुलाची दुसरीकडे शिक्षणासाठी टीसी मागितल्याच्या रागापोटी या दिव्यांग मुलांची टीसी पालकांच्या हातात देण्यात आली. त्यामुळे आता या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Intro:संस्थाचालकांने दिली दिव्यांग मुलाच्या हाती टीसीBody:संस्थाचालकांने दिली दिव्यांग मुलाच्या हाती टीसी; नामवंत इग्रजी शाळेेेचा प्रताप
शाळेची मान्यता रद्द करा-दिव्यांगच्या पालकाची मागणी

यवतमाळ : मारेगाव येथील नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळा संस्थाअध्यक्षाला एका पालकाने आपल्या दुसऱ्या मुलाच्या टिसीची मागणी केली. मात्र संस्थाचालकांने त्या पालकांच्या दिव्यांग मुलाची टिसी पालकाच्या हातात देवुन हाकलुन लावल्याचा आरोप
एका पालकाने केला आहे. त्यामुळे
शाळेची मान्यता रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे सह जिल्हाशिक्षणाधिकार्याकडे अपंगाच्या पालकानी केली आहे. मारेगाव शहरातील विद्यानिकेतन ईंग्लीश मिडीअम स्कुलमध्ये येथील अनिल नामदेव बोंडे यांचे दोन मुले तेजस व नयन शाळा शिकत होते. चालु शैक्षणीक वर्षात तेजस हा आठव्या वर्गात गेल्याने त्याला पुढील शिक्षणासाठी सोयीच्या द्रुष्टिने ईतरत्र पाठविण्याचे ठरविण्यात आले होते. तेजसच्या टिसीची रितसर मागणी करण्यात आली. मात्र संस्थाचालकांचा राग अनावर होवुन येथील संस्थाध्यक्षाने चक्क दुसऱ्याही दिव्यांग असलेल्या नयनची टिसी देवुन पालकाना हाकलुन लावले. अशी तक्रार अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ तथा जिल्हाशिक्षणाधिकारी यवतमाळ यांचे कडे केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्याची नियबाह्य टिसी हातात दिल्या प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. शासनाने अपग विद्यार्थ्याना शैक्षणीक सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना शिक्षणाचा हक्क प्रदान केला आहे. त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्याना सोयीच्या शाळेत ज्ञानार्जनाचे धडे घेता यावे यासाठी विशेष सवलत पुरविण्यात येते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याना पुढील शिक्षणा साठी शाळा बदलवायची असल्यास सबंधीत शाळेची मान्यता मीळवावी लागते. मात्र येथील शाळेच्या अध्यक्षाने पुढील शाळेत प्रवेशा सबधीचा दस्ताऐवज न मागता पहील्या मुलाची टिसी मागण्याच्या रागापोटी या दुसर्या दिव्यांग विद्यार्थ्याची टि.सी. दिल्याने दुसर्या शाळेत या अपंग विद्यार्थ्याचा प्रवेश गैरसोयीचा झाला आहे. त्यामुळे त्याच्या पुढील शैक्षणीक सत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असुन पुढील शैक्षणीक वर्षात शिक्षणाच्या हक्का पासुन वंचित ठेवणार्या या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पिडीत दिव्यांगच्या पालकाने केली आहे.

चौथ्या वर्गात शिकणाऱ्या नयन नावाच्या मुलाला शाळेच्या पटांगणात खेळत असताना शाळेच्या स्कूल बसने धडक देऊन तीन वर्षांपूर्वी अपघातग्रस्त केले होते. या अपघाताची तक्रार पोलिसात करू नये म्हणून पालकांना शाळेचे संस्थाअध्यक्ष व प्राचार्य यांनी या विद्यार्थ्यांचे बारावी वर्गापर्यंत शिक्षण मोफत देऊ असे आश्वासन दिले होते. या अपघातामध्ये नयन 53 टक्के अपंगत्व आले आहेत. मात्र आता मोठ्या मुलाची टीसी देतांना या आश्वासनाचा विसर प्राचार्य व संस्थाचालक यांना पडला आहे. केवळ मोठ्या मुलाची दुसरीकडे शिक्षणासाठी टीसी मागितल्याने या रागापोटी या दिव्यांग मुलांची
टीसी पालकांच्या हातात देण्यात आली. त्यामुळे आता या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.