महागाव : सुरेंद्र प्रकाशराव गावंडे (38) (Surendra Prakashrao Gawande) रा. आर्णी, असे सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. सराफा व त्यांच्या मित्रांशी अनोळखी नऊ जणांनी फोनद्वारे संपर्क साधला. खोदकामात सोन्याची नाणी मिळाली आहे. पाहिजे असल्यास कमी किमतीत देतो असे आमिष दाखवले. विश्वास पटवून देण्यासाठी दोन खरी सोन्याची नाणी दाखवली. दीड किलो सोने असून, 20 लाखांत सौदा ठरला. त्यानंतर सराफा व मित्राला रोख 20 लाख रुपये घेवून राष्ट्रीय महामार्गावरील नांदगव्हाण शिवारात बोलावले. मारहाण करून सराफाकडील 20 लाख रुपयांच्या रकमेवर दरोडा टाकून (cash of 6 lakhs seized) पळ काढला.
रोकड जप्त करण्यात आली : या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात ( Yavatmal Crime ) आला. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी महागाव ठाणेदारांसह स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी दहा दिवसांच्या कालावधीत गुन्ह्याचा छडा लावला. चार आरोपींना सोमवारी रात्री दहा वाजता दरम्यान अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, ठाणेदार संजय खंडारे, एपीआय अमोल सांगळे, नारायण पवार, मुन्ना आडे, वसीम शेख, संतोष जाधव, सुभाष जाधव, पंकज पातुरकर, ताज मोहम्मद, दिगांबर गिते यांनी केली. त्यांना सायबर सेल पथकाचे सहकार्यदेखील लाभले.
किनवट पोलिसांत गुन्हा दाखल : सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी महागाव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ते चार दिवसांत दोन हजार किलोमीटरचा प्रवास केला. महागाव, कळमनुरी, नांदेड, औरंगाबाद आदी ठिकाणाहून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. बहुतांश आरोपी नांदेड जिल्ह्यातील असून, दराटी व किनवट पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहे. चार आरोपी अटक (Robbery gang arrested) झाले असले तरी अद्याप गुन्ह्याचा मास्टरमाइंड पसार आहे. तसेच गुन्ह्यातील रोखही पूर्णपणे जप्त नाही. या गुन्ह्यात 9 ते 10 आरोपींचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. पसार आरोपींचा दोन पथकांकडून शोध घेतला जात आहे.