यवतमाळ : येथील तहसील चौकातील पोलीस मुख्यालयाच्या गेटवर बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास पोलीस नाईक रक्तबंबाळ व मृतावस्थेत आढळून आला. बारमधील वादानंतर पोलीस पुत्रासह त्याच्या सहकाऱ्याने पोलीस नाईकाचे ( Yavatmal Police Naik Murder Case ) हत्याकांड घडविल्याचे समोर आले ( Police Headquarters in Tehsil Chowk ) आहे. त्यामुळे एकच खळबळ ( Yavatmal Police Headquarters Murder Case ) उडाली आहे.
मृतक यवतमाळ पोलीस बॅण्ड पथकातील पोलीस नाईक : पोलीस नाईक निशांत लक्ष्मण खडसे ( Police Naik Nishant Laxman Khadse )(वय ३४) रा. पोलीस मुख्यालय, यवतमाळ असे मृताचे तर अभिषेक उर्फ अभी बोंडे (२८) रा. यवतमाळ, कुंदन मेश्राम (२५) रा. झरी जामणी अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. मृतक अकोला जिल्ह्यातील असून, तो सात ते आठ वर्षांपासून यवतमाळ पोलीस बॅण्ड पथकात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होता. त्यांचे पोलीस वसाहतीमध्येच त्याचे वास्तव्य होते.
पोलीस कर्मचारी सौरभ तोतीराम कांबळे यांनी प्रथम पाहिली दुचाकी : पोलीस कर्मचारी सौरभ तोतीराम कांबळे, (फिर्यादी) (वय २६) रा. पोलीस क्वॉर्टर हे १४ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता पोलीस मुख्यालय येथील रोल कॉलवर हजर राहून त्यानंतर नातेवाइकांना भेटण्यासाठी क्रिटीक्रेअर हॉस्पिटलला गेला होते. तेथून रात्री ११.४० वाजताच्या सुमारास पोलीस क्वॉर्टरकडे दुचाकीने सौरभ परत येत होते. रात्री ११.५५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालयाच्या लोखंडी गेटमधून क्वॉर्टरकडे जात असताना नगरपरिषद शाळा क्र. १ चे संरक्षक भिंतीला लागून असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एम. एच. ३० वाय ६३८७ क्रमांकाची दुचाकी पडलेली दिसली.
पोलीस नाईक निशांत हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळले : तेथील दुचाकी पाहिली असता सौरभ यांनी जवळ जाऊन पाहिले, तर दुचाकीच्या खाली पोलीस नाईक निशांत डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ अवस्थेत दबलेले दिसले. बाजूला रक्ताचा सडाही दिसला. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याने अवधूतवाडी पोलीस स्टेशन गाठून पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी निशांतच्या डोक्यावर दणकट हत्याराने वार करून खून केल्याचे दिसून आले. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.
मृतक व मारेकरी अभीमध्ये होता वाद : मृतक व मारेकरी अभीमध्ये वाद होता. यातूनच त्यांच्यात अनेकदा वादावादीही झाली. मृतक आणि मारेकरी दोघेही फिर्यादीच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हॉस्पिटलमध्ये असताना मारेकरी अभीने फोन करून शिवनाथ बारमध्ये निशांतसोबत भांडण झाले आहे, मी त्याला मारतो, असे सांगितले. अभी रागाच्या भरात वाटत असल्याने सौरभने त्याचा फोन कट केला होता, असे तक्रारीत नमूद आहे. तसेच अभीनेच निशांतची हत्या केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला.
पोलिसांकडून अभीसह त्याच्या सहकाऱ्यावर खुनाचा गुन्हा : त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत अभीसह त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास ठाणेदार मनोज केदारे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय नागेश खाडे व अन्य करीत आहे. पोलीस मुख्यालयाच्या गेटवरच पोलीस कर्मचाऱ्याची हत्या.
हेही वाचा : Roger Federer: जगातील महान टेनिसपटू रॉजर फेडररकडून निवृत्तीची घोषणा; वाचा सविस्तर पत्र