यवतमाळ - महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर पिंपळखुटी येथे सीमा तपासणी नाका आहे. या ठिकाणी खासगी व्यक्ती कामाला लावून वाहनचालकांकडून वसुली केली जात आहे, अशी तक्रार प्रादेशिक परिवहन अधिकारी (अमरावती) यांच्याकडे प्रहार वाहनचालक संघटनेने केली होती. तसेच हा प्रकार तत्काळ बंद करण्याची मागणी केली होती. यावर कारवाई करण्याचे निर्देश यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले होते. परंतु, अधिकारी त्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप प्रहार संगटनेने केला आहे.
दलालकडून परवाण्यासाठी जास्त पैसे-
प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती यांनी दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. शिवाय यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खासगी दलालकडून परवाण्यासाठी जास्त पैसे घेतले जात आहे. ही लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा- राळेगणसिद्धीमध्ये भाजप नेत्यांची धावपळ; अण्णा हजारे उपोषणावर ठाम..!