ETV Bharat / state

Shivsena Worker Murder Case : निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी केली शिवसैनिकाची हत्या- आमदार संजय राठोड - विरोधकांनी केली शिवसैनिकाची हत्या आमदार संजय राठोड

यवतमाळमध्ये शिवसैनिक सुनील डिवरे यांची काल हत्या करण्यात आली ( Shiv Sainik Sunil Divre Murder ) होती. याप्रकरणी आमदार संजय राठोड यांनी खळबळजनक आरोप केला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी डिवरे यांची हत्या केल्याचे त्यांनी म्हटले ( Sanjay Rathod On Shiv Sainik Murder Case ) आहे.

निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी केली शिवसैनिकाची हत्या- आमदार संजय राठोड

author img

By

Published : Feb 4, 2022, 7:05 PM IST

यवतमाळ : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसैनिक सुनील डिवरेची हत्या ( Shiv Sainik Sunil Divre Murder ) ही आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी केला ( Sanjay Rathod On Shiv Sainik Murder Case ) आहे.

निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी केली शिवसैनिकाची हत्या- आमदार संजय राठोड

..त्यामुळेच झाली हत्या

सुनील डीवरे हा एक कडवट शिवसैनिक होता. त्यांनी स्वकर्तुत्वाने गावात सत्ता आनलेली होती. तालुक्यामध्ये शिवसेनेचे वाढते वर्चस्व पाहता राजकीय पार्श्वभूमीतून त्याची हत्या करण्यात आली आहे. सुनील डीवरे हा जबाबदारीने वागणारा, पक्षाचे काम करणारा आणि शिवसेना पक्ष संपूर्ण तालुक्यात वाढवणारा कर्तुत्ववान कार्यकर्ता होता. त्याच्या पाठीमागे सर्वसामान्य गावातील संपूर्ण जनता उभी होती. आणि त्यामुळेच विरोधकांना हे पाहावले गेले नसल्याने त्याची घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

सर्वांना अटक झाली पाहिजे

या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात जरी आली. तरी हत्या करणार्‍या मागचे कट-कारस्थान कोणी केले, याचाही शोध लागला पाहिजे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, त्यांनाही पोलिसांनी अटक केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी पत्नी व मुलगा हे प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यामुळे या सर्वांना अटक झाली पाहिजे असे आमदार संजय राठोड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.