ETV Bharat / state

Ram Navami : रामनवमीनिमित्त यवतमाळ शहरातून भव्य मिरवणूक - रामनवमीनिमित्त यवतमाळ शहरातून मिरवणूक

यवतमाळ शहरात रामनवमीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, भगवे झेंडे लावण्यात आले. भजन गायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. भगवे झेंडे, बॅनर, फलक लावण्यात आले आहेत. पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.

Ram Navami
Ram Navami
author img

By

Published : Mar 30, 2023, 10:11 PM IST

यवतमाळ : यवतमाळ शहरात रामनवमीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. भारतीय संस्कृती, लोकसंस्कृती विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारी ही अनोखी मिरवणूक यवतमाळचा लोकोत्सव ठरली आहे. रामनवमी मिरवणूक यवतमाळमध्ये आकर्षणाचा विषय ठरली आहे. दुपारी ३ वाजता जयहिंद चौकातील श्री राम मंदिरापासून श्री राम, माता सीता लक्ष्मणाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. हा राम रथ मिरवणूक मार्गावर रामभक्तांकडून हाताने काढला जाईल. केरळ ड्रम बीट्स या नावाने प्रसिद्ध चंदा मालम वाद्य त्यावरील अप्रतिम कलात्मकता लक्ष वेधून घेणारी ठरली.

विविध कार्यक्रम : तसेच चेहऱ्याचे भाव, डोळ्यांचे भावपूर्ण भाव सादर करणारे 'कथकली' नृत्य सादर करण्यात आले. भगवान श्री रामाचे लाडके भक्त हनुमानाचे 10 फूट उंच महाबली रूप धारण केलेले कलाकार, ढोल ताशांच्या तालावर नाचणारे कलाकारही शोभायात्रेत आकर्षणाचे केंद्र बनले आहे. प्रसिद्ध वाघ नृत्य पुलिकाली कलाकारांनी सादर केले आहे. यासोबतच पांढरकवडा येथील पारंपरिक आदिवासी दंडार नृत्य, दारवा तालुक्यातील शंभर भजन पथक, कोलम पोटशावर डफ वाजवणारा 20 जणांचा ताफा, विविध रामायण काळातील चित्रपट देखावे आणि 70 हून अधिक तबलावादनाने सामाजिक प्रबोधन व त्याची झलक दाखवली. मिरवणुकीत भारतीय संस्कृती सहभागी झाली होती.

बजरंग दलाच्या 500 सुरक्षा रक्षकांचा समावेश : मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, भगवे झेंडे लावण्यात आले. भजन गायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. भगवे झेंडे, बॅनर, फलक लावण्यात आले आहेत. पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. सुरक्षा समितीत बजरंग दलाच्या 500 सुरक्षा रक्षकांचा समावेश यावेळी करण्यात आला होता.

भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना : 51 फूट भगव्या धार्मिक ध्वजाची प्रतिष्ठापना. रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने मोटारसायकल प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता श्री. दत्त मंदिर, दत्त चौक येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर त्या जागी ५१ फूट उंच भगवा ध्वज लावण्यात आला.

हेही वाचा - Dog Wearing Helmet : पुण्यात वाहतूक पोलिसाने घातले श्वानाला हेल्मेट; पाहा व्हिडिओ

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.