यवतमाळ -'आता खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर भारताचे अभिन्न अंग झाले आहे.' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त यवतमाळ येथे आले आहेत. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
जम्मू-काश्मीरला कालपर्यंत विशेष राज्याचा दर्जा होता. सोमवारी संसदेमध्ये कलम 370 व 35(ए) काढून टाकण्याचे विधेयक मंजुर करण्यात आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग झाले आहे. याची खरी पूर्तता सोमवारीच्या निर्णयामुळे झाली. हे धाडसाचे काम भाजप सरकारने केले. असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले. जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे आता त्यांचा सफाया होणार आहे. अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीर विकासापासून वंचित होते. या भागाचा विकास होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त यवतमाळ येथे आले आहेत. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली. याचीही माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री मदन येरावर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार निलय नाईक, आमदार संजय रेड्डी गुरुवार उपस्थित होते.