यवतमाळ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विदर्भातील वणी येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे रिंगणात आहे. जिल्ह्यातून या मतदारसंघात सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे बंडखोर उमेदवार असल्याने या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय मनसे निवडणूक लढविणार असल्याने काँग्रेस, भाजप यांच्या विजयाचे गणित बिघडणार असल्याचे अंदाज वर्तवल्या जात आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा मतदारसंघात आघाडी व युतीच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सर्वाधिक चुरस या मतदारसंघात आहे. काँग्रेसचे वामनराव कासावर, शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर आणि सुनील कातकडे आणि काँग्रेसचे संजय देरकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर मनसेकडून राजू उंबरकर हेही विरोधकांना आव्हान देत आहेत. मतदारसंघात मनसेची ग्रामीण भागात मोठी पकड आहे. शिवाय महाराष्ट्रातील वणी नगरपालिकेवर मनसेचा कब्जा आहे. मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून राजू उंबरकर यांचीओळख आहे. संघटनकौशल्य, युवकांची फळी आणि स्थानिक प्रश्नावर पाच वर्षात केलेली आंदोलने यामुळे वनी मतदारसंघांमध्ये मनसे ही निर्णायक भूमिका बजावणार आहे.