यवतमाळ - दिनांक 12 मार्च रोजी एक अल्पवयीन मुलगी मुळावा येथून बेपत्ता झाली होती. या बेपत्ता मुलीचा खून झाल्याचे वृत्त आता समोर आले आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून आठ दिवसांनंतर या घटनेचा सुगावा पोलिसांना लागला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी गजानन बोरके याला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा... दुहेरी हत्याकांडानं वर्धा हादरलं.. शेतात आई आणि मुलाची हत्या
मुळावा येथे एक आठ वर्षांची मुलगी शाळेत गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या वडिलांनी 12 मार्चला रात्री वसंतनगर पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी ताबडतोब तिच्या तपासासाठी एक पथक नियुक्त केले होते. आठ दिवसानंतर पोलिसांना या घटनेचा सुगावा लागला आहे. शाळेत गेलेल्या या मुलीला गजानन बोरके या व्यक्तीने दुचाकीवर नेऊन तिचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मुळावा येथील रहिवासी असलेल्या गजानन बोरके याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.