ETV Bharat / state

उपवर मुलांच्या स्वप्नांचा चुराडा; विवाह जुळण्यास दुष्काळाची आडकाठी

पाणीटंचाईमुळे पालकांना मुलींचे विवाह गावाऐवजी शहरात करावे लागतात. शहरात सभागृहापासून पाण्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी पाण्यासारखा खर्च होत असल्याने मुलींचे पालक कर्जाच्या खाईत लोटले जात आहेत.

उपवर मुलांच्या स्वप्नांचा चुराडा; विवाह जुळण्यास दुष्काळाची आडकाठी
author img

By

Published : May 4, 2019, 12:33 PM IST

यवतमाळ - गेल्या तीन-चार वर्षांपासून अपुऱ्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यावर जलसंकट कोसळले आहे. घाटंजी, बाभुळगाव, आर्णी, उमरखेड, पुसद आणि नेर या तालुक्यातील काही गावे तर पाण्यासाठी अक्षरशः रात्र जागून काढत आहेत. संपूर्ण दिवस त्यांचा पाण्यासाठी जात आहे. हे संकट आता अधिक भीषण झाले असून केवळ गावातील पाणी टंचाईमुळे तरुणांना लग्नसाठी मुली दिल्या जात नाहीत. त्यामुळे तरुणांवर लग्नापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. उपवर मुलांच्या स्वप्नांचा चुराडा होत असून विवाह जुळण्यास दुष्काळाची आडकाठी निर्माण झाल्याचे हे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नेर तालुक्यातील आजंती गावची सामाजिक परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र आहे.

नेर पासून अवघ्या ५ किलोमीतर अंतरावर अजंती हे ३००० लोकवस्तीचे गाव आहे. या गावात प्रवेश केला की लहान मुलांपासून तर ८० वर्षाच्या वृद्धांच्या डोक्यावर पाण्याचे हांडे दिसतात. देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्ष झाले. मात्र, या गावाची पाणी समस्या अजूनही कायम आहे.

उपवर मुलांच्या स्वप्नांचा चुराडा; विवाह जुळण्यास दुष्काळाची आडकाठी
अजंती गावामध्ये १२ विहिरी, आणि ८ हापसे आहे. त्यापैकी ११ विहिरी आणि ६ हातपंप कोरडे झाले आहे. त्यातून एक थेंबसुद्धा पाणी येत नाही. गावातील नागरिकांना काही अंशी पाणी मिळावे म्हणून उरलेल्या दोन विहिरीत पाणी पुरवठ्याच्या विहिरीतून पाणी टाकले जाते. या विहिरीतील पाणी संपले की तळ गाठलेल्या विहिरीत २०-३० फूट खाली उतरून तरुणांना ग्लासाने पाणी काढावे लागते. गावातील लोकांचा बहुतांश वेळ पाण्याच्या भटकंती मध्ये जातो. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम सुद्धा नाही. या गावातीळ ३०-३२ वयोगटातील ३८ तरुण गेल्या ४ वर्षांपासून लग्नासाठी वधू शोधत आहे. मात्र त्यांच्यापैकी दोघांना मुली मिळाल्या आहेत. तर ३६ मुलांना मुलीकडच्या लोकांनी केवळ गावातील पाणीटंचाईकडे बघून लग्नास नकार दिला आहे. लग्नानंतर आपल्या मुलीला डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी जन्मभर भटकंती करावी लागेल, अशी मुलींच्या वडिलांना भीती आहे. दुष्काळझळांनी ३६ तरुणांची लग्नस्वप्न होरपळल्या जात असल्याचे दिसून येत आहे. तर दोघांचे लग्न गाव सोडण्याच्या शर्तीवर जुळले. गावातील पाणीटंचाईने तरुणांच्या विवाहावर पाणी फेरले, अशी स्थिती आहे. या भीषण समस्येकडे प्रशासन किंवा पुढारी लक्ष देत नाही, असा आरोप तरुणांकडून केल्या जात आहे.

दोघांची विवाह जुळले -
गावातील ३८ तारुणांपैकी केवळ दोन तरुणांचे विवाह जुळले असले तरी त्यातील एक जण पुण्यात काम करत आहे. दुसऱ्याने तालुक्याच्या ठिकाणी संसार थाटण्याचा शब्द वधुपक्षाला दिला आहे. मात्र, दुष्काळझळांनी ३६ तरुणांची विवाहस्वप्ने होरपळून टाकली आहेत.

लग्नापासून डोक्यावर हंडा -
‘लग्न झाल्यापासून डोक्यात पाण्याशिवाय कोणताच विचार आला नाही,’ अशी मार्मिक प्रतिक्रिया निर्मला अरसोड या वृद्धेने दिली. आता मुले, सुना, नातवंडांची तरी या समस्येतून सुटका व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पाणीटंचाईमुळे तरुण शहरात स्थलांतरित होत आहेत.

मुलींचे विवाह शहरात -
पाणीटंचाईमुळे पालकांना मुलींचे विवाह गावाऐवजी शहरात करावे लागतात. शहरात सभागृहापासून पाण्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी पाण्यासारखा खर्च होत असल्याने मुलींचे पालक कर्जाच्या डोंगराखाली दबून जातात, ही व्यथा आजंती येथील एका पालकाने सांगितली.

Intro:उपवर मुलांच्या स्वप्नांचा चुराडा
विवाह जुडणायस दुष्काळाची आडकाठी
आजंती गावची सामाजिक परिस्थिती बिघडलीBody:यवतमाळ : गेल्या तीनचार वर्ष पासून अपुऱ्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यावर जलसंकट येऊन कोसळलं. घाटंजी, बाभुळगाव, आर्णी, उमरखेड, पुसद आणि नेर या तालुक्यातील काही गाव तर पाण्यासाठी अक्षरशः रात्र जागून काढत आहे. संपूर्ण दिवस त्यांचा पाण्यासाठी जात आहे. हे संकट आता अधिक भीषण झालं असून केवळ फक्त गावातील पाणी टंचाईमुले तरुणांना लग्नसाठी मुली दिल्या जात नाही. त्यामुळे तरुणावर लग्नापासून वंचित राहण्याची वेळ आली. उपवर मुलांच्या स्वप्नांचा चुराडा होत असून विवाह जुडणायस दुष्काळाची आडकाठी निर्माण झाल्याचे हे विदारक सत्त्य आहे. त्यामुळे नेर तालुक्यातील आजंती गावची
सामाजिक परिस्थिती बिघडत आहे.

नेर पासून अवघ्या 5 किलोमीतर अंतरावर अजंती हे 3000 लोकवस्तीचं गाव आहे. या गावात प्रवेश केला कि लहान मुला मुली पासून तर 80 वर्षाच्या म्हातारीच्या डोक्यावर गुंड दिसतो. देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाले. मात्र या गावाची पाणी समस्या अजूनही कायम आहे.

अजंती गावामध्ये 12 विहिरी ,आणि 8 हातपम्प आहे. त्यापैकी 11 विहिरी आणि 6 हातपंप कोरडे झाले आहे. त्यातून थेम्ब सुद्धा पाणी येत नाही. गावातील नागरिकांना काही अंशी पाणी मिळावं म्हणून उरलेल्या दोन विहिरीत पाणी पुरवठ्याकच्या विहिरीतून पाणी टाकलं जाते. या विहिरीतील पाणी संपलं कि तळ गाठलेल्या विहिरीत 20-30 फूट खाली उतरून तरुणांना ग्लासाने पाणी काढावे लागते. गावातील लोकांचा बहुतांश वेळ पाण्याच्या भटकंती मध्ये जातो. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम सुद्धा नाही. या गावातीळ 30-32 वयोगटातील 38 तरुण गेल्या 4 वर्ष पासून लग्नासाठी वधू शोधत आहे. मात्र त्यांच्या पैकी दोघांना 36 मुलांना मुलीकडच्या लोकांनी केवळ गावातील पाणी टंचाई कडे बघून लग्नास नकार दिला आहे. लग्न नंतर आपल्या मुलीला डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी जन्मभर भटकंती करावी लागेल. अशी मुलीच्या वडिलांना भीती आहे. दुष्काळझळांनी 36 तरुणाची लग्नस्वप्न होरपळल्या जात असल्याचं दिसून येत आहे. तर दोगांची लग्न गाव सोडण्याच्या शर्तीवर जुळले. गावातील पाणी टंचाईने तरुणांच्या विवाहावर पाणी फेरले. अशी स्थिती आहे. या भीषण समस्या कडे प्रशासन किव्वा पुढारी लक्ष देत नाही आरोप तरुणांकडून केल्या जात आहे.

दोघांची विवाह जुडले

गावातील 38 तारुणांपैकी केवळ दोन तरुणांचे विवाह जुळले असले तरी त्यातील एक जण पुण्यात काम करत आहे. दुसऱ्याने तालुक्याच्या ठिकाणी संसार थाटण्याचा शब्द वधुपक्षाला दिला आहे. मात्र, दुष्काळझळांनी 36 तरुणांची विवाहस्वप्ने होरपळून टाकली आहेत.

लग्नापासून डोक्यावर हंडा
‘लग्न झाल्यापासून डोक्यात पाण्याशिवाय कोणताच विचार आला नाही,’ अशी मार्मिक प्रतिक्रिया निर्मला अरसोड या वृद्धेने दिली. आता मुले, सुना, नातवंडांची तरी या समस्येतून सुटका व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पाणीटंचाईमुळे तरुण शहरात स्थलांतरित होत आहेत. प

मुलींचे विवाह शहरात

पाणीटंचाईमुळे पालकांना मुलींचे विवाह गावाऐवजी शहरात करावे लागतात. शहरात सभागृहापासून पाण्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी पाण्यासारखा खर्च होत असल्याने मुलींच्या पालकांचे पाय कर्जात रुततात, ही व्यथा आजंती येथील एका पालकाने सांगितली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.