यवतमाळ - जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून एम. देवेंद्र सिंह यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होताच त्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
हेही वाचा... संपूर्ण जगच अधिकाधिक राष्ट्रवादी बनत आहे - जयशंकर
पदभार स्विकारल्यानंतर एम. देवेंद्र सिंह यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पी.एम. किसान योजना तसेच जिल्ह्याचे प्राधाण्यक्रम असलेल्या योजनांबाबत विचारपूस केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगले काम करण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.