ETV Bharat / state

एकाच दोरीने प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर-तुळजापूर महामार्गाजवळ असलेल्या अंबोडा गावात प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

अंबोडा
अंबोडा
author img

By

Published : Oct 26, 2020, 5:20 PM IST

यवतमाळ - महागावपासून तीन किलोमीटर व नागपूर-तुळजापूर हायवेवर वसलेल्या अंबोडा या गावी प्रेमी युगुलाने काल (दि. 25 ऑक्टोबर) सायंकाळी एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

25 ऑक्टोबरला दसरा असल्याने गावातील नागरिक दसरा आनंदात साजरा करण्यात मग्न असताना दोन प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येच्या घटनेने आनंदावर विरजन पडले. गावाला लागूनच शंकरराव राऊत यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास तरुण व तरुणीने गळफास घेतल्याची माहिती गावात पसरली. घटनास्थळी पोलीस पाटील रंजना शिंदे, सरपंच हनुमंतराव देशमुख दाखल झाले. अंकुश पंडित भालेराव (वय 25 वर्षे), तरुणी सुबिना परवीन शेख मंजूर (वय 20 वर्षे, दोघेही रा. आंबोडा), अशी त्यांची नावे आहेत.

मृतांची ओळख पटताच नातेवाईकांसह महागाव पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली. घटनेची महिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शव उत्तरीय तपासणी करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत. या दुःखद घटनेने संपूर्ण आंबोडा गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव; तणनाशक फवारून दोन एकर पीक केले नष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.