यवतमाळ - लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. आता मात्र यवतमाळ शहर वगळून इतर ठिकाणी मद्यविक्रीला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली. त्यामुळे वणी येथे मद्य खरेदीसाठी नागरिकांनी रांग लावल्याचे चित्र दिसून येत होते. शासनाने दिलेल्या कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे या दुकानासमोर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.
जिल्हाधिकारी यांचे आदेश निघाल्यानंतर केवळ एकमेव वणी येथील मद्य दुकान सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली. तर उद्यापासून जिल्ह्यातील इतर ठिकाणी मध्ये विक्रीचे दुकाने व बिअर शॉपी सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात लॉकडाउन कालावधीत किरकोळ विक्री, अबकारी अनुज्ञप्ती, अनुज्ञप्तीचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता जिल्ह्यातील एफएल-2, एफएलबिआर-2, सीएल-3 अनुज्ञप्तीचे व्यवहार (यवतमाळ नगर परिषद हद्द वगळून) पुढील आदेशापर्यंत अटींच्या अधीन राहून चालू करण्याची परवानगी देण्यात येत आली आहे. तसेच मद्याचे घाऊक, ठोक विक्रेत्या एफएल -1 व सीएल-2 अनुज्ञप्त्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू करण्याची देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेतच व्यवहार सुरु ठेवता येणार आहे.