ETV Bharat / state

पत्रकारास मारहाण; पोलिसास निलंबित करण्यासाठी अधीक्षकांना ‘श्रमिक’चे निवेदन

author img

By

Published : Feb 6, 2021, 3:29 AM IST

Updated : Feb 6, 2021, 3:35 AM IST

भाजपाच्या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांनी मारहाण केली. या प्रकरणी मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास तत्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा पत्रकार संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.

journalist
पोलिसास निलंबित करण्यासाठी अधीक्षकांना ‘श्रमिक’चे निवेदन

यवतमाळ - भारतीय जनता पक्षाद्वारे करण्यात येत असलेल्या टाळे ठोको आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारास पोलीस कर्मचार्‍याने लाठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. शहरातील बसस्थानक चौकातील वीजवितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारासही घटना घडली. या प्रकरणी श्रमिक पत्रकार संघाकडून संताप व्यक्त त्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

पत्रकारास मारहाण; पोलिसास निलंबित करण्यासाठी

मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास तत्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा पत्रकार संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला. सचिन येवले, असे मारहाण झालेल्या पत्रकाराचे नाव असून, ते एका वृत्तवाहिनीसाठी काम करतात. तर, तुषार अंबाधरे, असे मारहाण करणार्‍या पोलिसाचे नाव आहे.

पत्रकार असल्याचे सांगितल्याने मारहाण-

भाजपच्या वतीने वाढीव वीज बिलाविरोधात शुक्रवारी राज्यव्यापी टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार येवले हे देखील गेले होते. त्यावेळी महावितरण कार्यालयात जाण्यास पोलिसांकडून अटकाव करण्यात आला. त्यावेळी येवले यांनी पत्रकार असल्याची ओळख सांगितली. त्यानंतर येवले यांना कार्यालयाच्या गेटच्य आत ओढून लाठीने मारहाण केली. यात येवले यांचा मोबाईल फुटला.

या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करीत पत्रकारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. त्या पोलिसालाही पाचारण करण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या उत्तरामुळे पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. मारहाण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास निलंबित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Last Updated : Feb 6, 2021, 3:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.