ETV Bharat / state

नाल्यावरील पुलांचा उपयोग जलसंधारणासाठी; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभिनव प्रयोग

दीड फूट खोल आणि बारा मीटर रुंद असलेल्या मृत नाल्याला जिवंत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाखाली बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या माध्यमातून केले आहे. यामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून उन्हाळ्यात सुध्दा पीक घेता येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभिनव प्रयोग
author img

By

Published : Aug 22, 2019, 10:24 PM IST

यवतमाळ - सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्यावरील पुलांचा उपयोग जलसंधारणासाठी करून नवा प्रयोग यशस्वी केला आहे. यामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रयोग कमी खर्चात पूर्ण केल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभिनव प्रयोग

जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पिंपरी-कलगा ते वाळकी-मारवाडी या रस्त्यावर एक कोटी 83 लाख रुपयांच्या पुलाचे निर्माण काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. याच पुलाखाली एक मृत नाला होता. बाजूला असलेल्या वाळकी येथील तलावाचे पाझरणारे पाणी या नाल्यातून जात होते. मात्र, तो नाला पावसाळा संपताच कोरडा पडायचा. दीड फूट खोल आणि बारा मीटर रुंद असलेल्या या नाल्याला जिवंत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने या बंधाऱ्याच्या माध्यमातून केले. त्याद्वारे बंधारा लगतच्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सुध्दा पीक घेता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विशिष्ट अंतरावरून धबधब्यासारखे कोसळणारे पाणी असे दृष्य या पुलाखाली बांधलेण्यात आलेल्या बंधाऱ्याजवळ तयार झाले आहे. जलसंधारणच्या या नव्या प्रयोगामुळे कमी पावसाच्या प्रदेशात हे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे.

यासाठी हा नाला 2 मीटर खोल करण्यात आला. तसेच त्याची रुंदी 30 मीटर पर्यंत वाढविण्यात आली. बाजूच्या तलावाचे पाझरणारे पाणी अडविण्यासाठी लंब वर्तुळाकार आकाराचे बंधारे पुलाच्या खाली बांधण्यात आले. या बंधार्‍याला साधारण 15 लाख रुपये खर्च आला असून हा बंधारा 32 दिवसात पूर्ण झाला. या बंधाऱ्यामुळे लगतच्या भागातील विहिरी, बोअर रिचार्ज झाल्या असून पाणी पातळीत वाढ झाली आहे.जलसंपदा विभागाच्या नियमानुसार एक क्यूसेक पाणी थांबण्यासाठी एक लाख 74 हजार रुपये खर्च येतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ 15 लाख रुपये खर्च करून 20 क्यूसेक पाणी अडविण्यात यश मिळविले आहे. जवळपास 750 मीटर लांब साठलेले पाणी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Intro:Body:यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्यावरील पुलांचा उपयोग जलसंधारणासाठी करून नवा प्रयोग यशस्वी केला आहे. यामुळे परिसरातील पाण्याची पातळीत वाढ तर झालीच. पण कमी खर्चात जलसंधारण करण्याचा अभिनव प्रयोग सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. या प्रयोग जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेचा आणि कुठलाच विषय ठरला आहे.
जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पिंपरी-कलगा ते वाळकी-मारवाडी या रस्त्यावर एक करोड 83 लाख रुपयांच्या पुलाचे निर्माण काही दिवसांपूर्वी पुर्ण झाले. याच पुलाखाली एक मृत नाला होता. बाजूला असलेल्या वाळकी येथील तलावाचे झिरपणारे पाणी या नाल्यातून जात होत. मात्र तो नाला पावसाळा संपताच कोरडा व्हायचा. दीड फूट खोल आणि बारा मीटर रुंद असलेल्या या नाल्याला जिवंत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने या बंधाऱ्याच्या माध्यमातून केले. त्याद्वारे बंधारा लगतच्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सुध्दा पीक घेता येईल असे चित्र निर्माण झाले आहे. विशिष्ट अंतरावरून पाणी कोसळत असल्याचे जे दृश्य दिसत आहे तो कुठला धबधबा नसून तो पुलाखाली बांधलेला बंधारा आहे. जलसंधारणच्या या नव्या प्रयोगामुळे कमी पावसाच्या प्रदेशात हे सकारात्मक चित्र आहे दिसू लागले आहे.
यासाठी हा नाला 2 मीटर खोल करण्यात आला. तसेच त्याची रुंदी 30 मीटर पर्यंत वाढविण्यात आली. बाजूच्या तलावाचे झिरपणारे पाणी अडविले पाहिजे यासाठी इलिप्टीकल आकाराचे बंधारे पुलाच्या खाली बांधण्यात आले. या बंधार्‍याला साधारण 15 लाख रुपये खर्च आला. हा बंधारा 32 दिवसात पूर्ण झाला. या बंधाऱ्यामुळे लगतच्या भागांतील विहिरी, बोअर रिचार्ज झाल्या असून पाणी पातळी आहे.
जलसंपदा विभागाच्या नियमानुसार एक क्यूसेस पाणी थांबण्यासाठी एक लाख 74 हजार रुपये खर्च येतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ 15 लाख रुपये खर्च करून 20 क्यूसेस पाणी अडविण्यात यश मिळविले आहे. जवळपास 750 मीटर लांब थांबलेले पाणी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे .

1) बाईट : भूपेश कथलकर उप सहाय्यक अभियंता, नेर
2) बाईट :अशोक मसराम, शेतकरी (वाळकी) Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.