यवतमाळ: मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाजारपेठेत पुन्हा गर्दी
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांमध्ये 843 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र तरीदेखील नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसून येत नाहीत. नागरिक रस्त्यावर विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहेत. बाजारपेठेत देखील नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान अशिच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यात 929 कोरोनाबाधित
सद्यास्थितीमध्ये जिल्ह्यात 929 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 15 हजार 970 वर पोहोचला आहे. त्यापैकी 14595 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात 446 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 929 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.