ETV Bharat / state

जलवाहिनीचा एअर कॉक निसटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय - water pipe air cock escaped digras

जिल्ह्यातील दिग्रस शहरातील मानोरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा एअर कॉक अचानक निसटला. त्यामुळे, जलवाहिनी सिमेंट खांबातील पाइपमधून जवळपास ३० फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते.

water pipe air cock escaped digras
एअर कॉक निसटला दिग्रस
author img

By

Published : Feb 6, 2021, 7:35 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील दिग्रस शहरातील मानोरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा एअर कॉक अचानक निसटला. त्यामुळे, जलवाहिनी सिमेंट खांबातील पाइपमधून जवळपास ३० फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे, नागरिकांची तारांबळ उडाली. दिग्रस शहराच्या लगतच असलेल्या अरुणावती धरणावरून मानोरासह तालुक्यातील २८ गावांना या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

पाण्याचा फवारा

हेही वाचा - ९१ वर्षांची परंपरा खंडीत; बाबा कंबोलपोष उरुस यात्रा रद्द

यापूर्वी फुटली होती पाईपलाईन

अरुणावती प्रकल्पातून पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी तीन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू असताना फुटली होती. तर, आज जलवाहिनीचा कॉक निसटल्याने जवळपास ३० फुट उंच पाण्याचा फवारा सुरू झाला. हा फवारा जलवाहिनीवरून जाणाऱ्या विद्युत तारांना स्पर्श करत होता. त्यामुळे, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना, तसेच जवळच असणाऱ्या दुकानदारांच्या मनात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, विद्युत प्रवाह बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी जलवाहिनी वेळीच दुरुस्त केली. मात्र, तोपर्यंत लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता.

हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकारच हीच मिस्टेक- माजी ऊर्जा राज्यमंत्री येरावार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.