यवतमाळ- येथील महागाव तालुक्यातील धारेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून दारू भट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गावातील तरुण पिढी दारूच्या आहारी गेली आहे. गावातील इतरही नागरिक दारू सेवनामुळे जीवन व संसार उद्ध्वस्त करून बसले आहेत. अनेक वेळा महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, गावातील दारू भट्ट्या बंद झाल्या नाहीत. त्यामुळे महिला बचत गटांच्या महिलांनी महागाव पोलीस ठाण्यावर धडक दिली.
हेही वाचा- मुंबईकरांना थंडावा देणाऱ्या लोकलमधून रेल्वेला तब्बल 38 कोटी उत्पन्न
पोलीस दारू भट्ट्या चालकावर थातूरमातूर कारवाई करतात. त्यामुळे दारू विक्रेते बळावले आहेत. यामुळे तक्रारकर्त्याला मारहाणीसारख्या घटना घडत आहेत. शेवटी गावातील महिला बचत गटांनी दारू बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी महागाव पोलीस ठाण्यात जाऊन दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही कळविले आहे. कार्यवाही न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. यावेळी 13 महिला बचत गट, पोलीस पाटील दत्ता इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास भिसे यांची उपस्थिती होती.