यवतमाळ - कोरोना काळात शेतकरी आणि वीजग्राहक आर्थिक संकटात सापडले आहेत. या काळातील वीजबिल माफ करण्याची घोषणा महाविकासआघाडी ने केली होती. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना वेठीस धरत असल्याने हे महाविकास आघाडीचे सरकार इंग्रजा पेक्षाही जुलमी आहे, असा आरोप माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच या जुलमी सरकारविरोधात लवकरच तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
वीजबिलासंदर्भात लवकरच आंदोलन -
भाजपचे सरकार असताना 45 लाख शेतकऱ्यांचे आणि 22 हजार घरगुती वीज कनेक्शन कापले गेले नाही. मात्र, या शासनाने तो निर्णय घेऊन वीजकट करण्याचा घाट घातला आहे. कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करू, शंभर युनिट पाच वर्षांपर्यंतचे बिल माफ करू, अशी घोषणा या सरकारने केली होती. पंरतु सरकारला या घोषणेचा विसर पडला, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. तसेच वीजबिलासंदर्भात लवकरच आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - प्रेमप्रकरणातून व्हॅलेंटाईन डे ला दुहेरी हत्याकांड; कुरळ पूर्णा येथे थरार