यवतमाळ - आर्णी तालुक्यातील येरमल हेटी येथे एका सतरा वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. जखमी मुलगी पुणे येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कामासाठी गावी आली होती.
हेही वाचा - यवतमाळमधील 'त्या' 9 पैकी 2 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह, नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी
पीडित मुलगी घरी एकटी असताना तिच्या गळ्यावर अंकुश नावाच्या तरुणाने तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर आरोपी अंकुश फरार झाला. मुलीची प्रकृती चिंताजनक असून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.