ETV Bharat / state

Ganeshotsav 2022 : राळेगावात शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी गणपती बाप्पा अवतरले

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. यवतमाळ शहरातही यंदा गणेशोत्सव ( Yavatmal Ganeshotsav ) मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. वेगवेगळे देखावे यवतमाळ मधील मंडळांनी तयार केले आहेत. यंदा लक्ष वेधले आहे ते यवतमाळच्या न्यू बाल गणेश उत्सव मंडळाने शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवणारा दोखावा त्यांनी सादर केला आहे.( Ganapati Bappa appeared to boost the morale of the farmers )

Ganapati Bappa appeared to boost the morale of the farmers
शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी गणपती बाप्पा अवतरले
author img

By

Published : Sep 5, 2022, 4:09 PM IST

यवतमाळ : कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. यवतमाळ शहरातही यंदा गणेशोत्सव ( Yavatmal Ganeshotsav ) मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. वेगवेगळे देखावे यवतमाळ मधील मंडळांनी तयार केले आहेत. यंदा लक्ष वेधले आहे ते यवतमाळच्या न्यू बाल गणेश उत्सव मंडळाने शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवणारा दोखावा त्यांनी सादर केला आहे.( Ganapati Bappa appeared to boost the morale of the farmers )

समस्त शेतकऱ्यांना संदेश - संकट आणि शेतकरी हे जरी समीकरण असले तरी संकटे येतात आणि जातात मात्र शेतकऱ्यांनी आपला धीर सोडू नये. यासाठी प्रत्यक्षात गणपती बाप्पा शेतकऱ्यांचे पाय पकडून गळफास घेऊन आत्महत्या करू नये, देवबाप्पा आपल्या पाठीशी आहे ते मदतीला धावून आले आहे. असा समस्त शेतकऱ्यांना संदेश देण्यासाठी हा देखावा उभारण्यात आला आहे. या मंडळात केवळ 20 वर्षाआतील सर्व शेतकऱ्यांची मुले असून त्यांच्या सामाजिक आणि मानवतावादी संदेशातून भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक अनुचित घटनेला निश्चितच आळा बसणार हे निश्चित.

राळेगावात शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी गणपती बाप्पा अवतरले

यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सुपरिचित आहे. अशातच यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास 40 हजार हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले. घेतलेले बँकांचे व सावकाराचे कर्ज कसे फेडावे या वीवंचनेत आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलू लागला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शेतकऱ्यांची मुलेच पुढे आली असून आपल्या न्यू बाल गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्यातून प्रत्यक्ष देवबाप्पा जमिनीवर येऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून थांबवत असल्याचा देखावा उभारला आहे.

हेही वाचा :Ganpati Visarjan 2022: आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप; दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराई निघाली सासरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.