ETV Bharat / state

राज्यात हनिमून सरकार आहे का?; माजी राज्यमंत्र्याचा महाविकास आघाडीवर निशाणा

author img

By

Published : Feb 14, 2021, 5:02 PM IST

Updated : Feb 14, 2021, 5:54 PM IST

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिचा फोन, लॅपटॉप ताब्यात घेण्यासाठी का प्रयत्न करत होते, त्यात असे काय दडलेले आहे याचा खुलासा झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावे, अशी मागणी भाजप नेते मदन येरावार यांनी केली.

मदन येरावार
मदन येरावार

यवतमाळ - पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. या प्रकरणात विरोधकांकडून शिवसेना मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले जात आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक वार सुरू आहेत. या वादात आता माजी राज्यमंत्री तथा भाजपचे आमदार मदन येरावार यांनी उडी घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

मदन येरावार

वनमंत्र्यानी स्वतः समोर यावे
पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या बाराही क्लिपमध्ये संजय राठोड यांचा आवाज आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. राठोड, अरुण आणि पूजाचा मोबाईल पोलिसांनी जप्त करायला पाहिजे. संजय राठोड यांनी स्वतः समोर येऊन खुलासा करण्याचा सल्ला येरावार यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी खोलात चौकशी करावी
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिचा फोन, लॅपटॉप ताब्यात घेण्यासाठी का प्रयत्न करत होते, त्यात असे काय दडलेले आहे याचा खुलासा झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावे, अशी मागणी भाजप नेते मदन येरावार यांनी केली. एखादया मंत्र्यांवर असे आरोप लागत असेल तर त्या मंत्र्यांनी पुढे आले पाहिजे. आठ दिवस होऊनसुद्धा एवढ्या ऑडिओ क्लिप असताना चौकशी होत नाही त्यामुळे हे सरकार महिलांप्रती किती सजग आहे हे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या ऑडिओ क्लिप ऐकल्या पाहिजे. १२ ऑडिओ क्लिपमधील संभाषणात राठोड यांचा आवाज स्पष्ट समजून येतो. त्यामुळे संशय निर्माण होत आहे. आम्ही या संदर्भात आंदोलनसुद्धा करू असा इशाराही येरावार यांनी दिला आहे.

Last Updated : Feb 14, 2021, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.