यवतमाळ - पुसद शहरालगतच्या मुंगसाजी नगर के.डी.जाधव तांडा येथील शेतकऱ्याच्या घराला व गोदामाला सकाळी 10 च्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या आगीमध्ये खोलीतील गोदामात ठेवलेल्या भुईमुंगासह, घरगुती उपयोगी वस्तूही जळून खाक झाल्या आहेत. या आगीत ४ लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेख जाफर शेख अहेमद (५५) रा.गढीवार्ड, असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नुकसान भरपाईची मागणी -
शेख जाफर शेख अहेमद यांच्या मालकीची मोजा मुंगसाजी नगर येथील शेतात गोडाऊन व राहण्यासाठी घर आहे. येथील घराला सकाळी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने घरासह गोदामात ठेवलेले शेतातील भुईमुंगसाचे पीक जळून खाक झाले. आगीने उग्र रूप धारण केल्याने इमारतीमध्ये ठेवलेल्या घरगुती उपयोगी साहित्याचीसुद्धा राख रांगोळ झाली. सुदैवाने घरात कोणीच नसल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले.
हेही वाचा - म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय रुई येथे स्वतंत्र कक्षाची स्थापना