ETV Bharat / state

वाळू व्यावसायिकांकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण - चंदन हातगाडे मारहाण

मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रोसिटीसह अनेक गुन्हे दाखल दाखल आहेत. या नऊ वाळू व्यावसायिकांपैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर 5 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. चंदन हातगाडे हा आरटीआय कार्यकर्ता असून त्याने रेती व्यावसायिकांनी खंडणी मगितल्याच्या कारणावरून मारहाण झाली असल्याचीही माहिती समोर येत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण

author img

By

Published : May 21, 2021, 12:51 PM IST

यवतमाळ - वाळू घाटाची माहिती मागणे, ट्रकचे फोटो काढणे या कारणावरून वाळू घाट व्यावसायिकांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पांढरकवडा रोडवर ही मारहाण झाली. चंदन हातगाडे( रा. नेताजीनगर) असे माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. हातगाडे याने या मारहाणी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वाळू व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तब्बल ९ वाळू व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण
पाच लाखाची मागणी केल्याची चर्चाचंदन हातागळे यांनी वाळू व्यावसायिकांना पाच लाखाची खंडणी मागितल्याची माहिती समोर येत आहे. त्याच कारणावरून पांढरकवडा रोडवरील एका ठिकाणी चंदन याला नेत त्याला विवस्त्र करीत मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रोसिटीसह अनेक गुन्हे दाखल दाखल आहेत. या नऊ वाळू व्यावसायिकांपैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर 5 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. चंदन हातगाडे हा आरटीआय कार्यकर्ता असून त्याने रेती व्यावसायिकांनी खंडणी मगितल्याच्या कारणावरून मारहाण झाली असल्याचीही माहिती समोर येत आहे.वाळू व्यावसायिकांची अधीक्षकांकडे तक्रार-आरटीआय कार्यकर्ता चंदन हातागळे हा मागील अनेक दिवसांपासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे खोटी तक्रार करून पाच लाख रुपयांची मागणी करत होता. तसे न केल्यास वाळूघाट(लिलाव) रद्द करण्याची धमकी देत होता. पैसे न दिल्यामुळे चंदन हातागळे यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अशा प्रकाराची तक्रार वाळू व्यावसायिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्याकडे केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.