यवतमाळ - किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात किटकनाशक फवारणीचा जोर वाढलेला दिसून येत आहे. मात्र, फवारणीमुळे गेल्या दोन दिवसांत चार शेतमजुरांना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांची वाढ झालेले आहे. त्यामुळे किडीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सुरक्षा किट उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरीसुद्धा शेतकरी-शेतमजूर किटचा वापर करताना दिसत नाहीत.
हेही वाचा - VIDEO : बैल जेव्हा उधळतो.. पाहा यवतमाळच्या पोळ्यातील बैलाचा थरार
जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहेत. दोन वर्षापूर्वी किटकनाशकांच्या फवारणीने 22 शेतकरी शेतमजूरांचा मृत्यू झाला होता. तर 900 च्या वर शेतकरी-शेतमजूरांना विषबाधा झाली होती. ऑगस्ट महिन्याच्या फवारणीच्या कामाला वेग आल्याने विषबाधेचे प्रमाण वाढले आहेत. अशा रुग्णांवरती उपचार करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात विशेष कक्षही उघडण्यात आलेला आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये गणेश मूर्तीतून 'वृक्षारोपण'; भक्तीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश