ETV Bharat / state

ना पीककर्ज ना मालाची विक्री; तरीदेखील पुन्हा शेतशिवार फुलवण्यासाठी बळीराजाचे जीवाचे रान

या आठवड्यात राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास साडे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे.

author img

By

Published : Jun 5, 2020, 6:51 PM IST

Updated : Jun 25, 2020, 4:59 PM IST

Farmer
शेतकरी

यवतमाळ - सध्या शेतकरी जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे शेतीमालाची विक्री न झाल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाही. अशा बिकट परिस्थितीतही बळीराजा काळ्या मातीत घाम गाळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास साडे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत

या आठवड्यात राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी शेतात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील सुनंदा आत्राम व त्रिशक्ती हे मायलेक भर उन्हात आपल्या पाच एकर दगडी शेतजमिनीत घाम गाळत आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांनी आपल्या शेतातील अर्धा कापूस खासगी व्यापाऱ्याला मिळेल त्या भावात विकला. तर अर्धा कापूस अजूनही घरात पडून आहे. गेल्या तीन महिन्यात हाताला काम नव्हते, परिणामी त्यांच्या हातात पैसे नाही. मजूर लावले तर त्यांना पैसा कुठून देणार अशा प्रश्न असल्यामुळे संपूर्ण आत्राम कुटुंब भल्या पहाटेपासूनच शेतात राबत आहे. आता चांगल्या पावसाच्या आगमनाची प्रतिक्षा हे आत्राम मायलेक करत आहेत.

यवतमाळ तालुक्यातील वाकी गावात देखील लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता पेरणीची ओढ लागली आहे. उत्तम बन्सोड हे शेतकरी देखील सध्या शेतजमिनीची मशागत करत आहेत. त्यांच्या प्रमाणेच इतर शेतकरी देखील शेतातील काडीकचरा वेचणे, नांगर फळी चालवणे आदी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त आहे.

कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अडचणीच्या या काळात खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी पैसा आणायचा कुठून? या चिंतेत शेतकरी आहेत. पीककर्ज न मिळाल्याने आणि शेतमाल अद्याप घरीच असल्याने शेतकरी हतबल आहेत. तरी देखील पुन्हा शिवार फुलवण्यासाठी बळीराजा जीवाचे रान करत आहे.

Last Updated : Jun 25, 2020, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.