ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याने शोधली 'प्रकाशवाट'; हळद पावडर तयार करून विक्री

प्रकाश यांनी शेतात पिकविलेल्या हळदीची पावडर विकून आयुष्यात 'प्रकाशवाट' निर्माण केली आहे. त्यांनी यंदा पारंपरिक पिकासोबतच हळदीची लागवड करण्याचा प्रयोग प्रथमच केला. त्यांच्याकडे एकूण सहा एकर शेती आहे. त्यापैकी अर्ध्या एकरात हळदीचे पीक घेतले. चांगले उत्पादन झाले. तब्बल एकोणीस क्विंटल हळद झाली. मात्र, कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ ठप्प झाली. अखेर कौटुंबिक चर्चेतून त्यांनी यावर उपाय काढलाच..

author img

By

Published : Oct 4, 2020, 2:47 PM IST

Updated : Oct 6, 2020, 1:58 PM IST

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याने शोधली 'प्रकाशवाट'

यवतमाळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शेतात पिकवलेल्या हळदीच्या पावडरची विक्री करत महागाव (क) येथील शेतकऱ्याने 'प्रकाशवाट' शोधून आदर्श निर्माण केला. जिल्ह्यातील महागाव कसबा येथील प्रकाश दुधे या शेतकऱ्याने परिस्थितीवर मात करत हा उपाय शोधून काढला. त्यांच्या कुटुंबीयांचीही चांगली साथ त्यांना मिळाली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. भारत देश सुद्धा याला अपवाद नाही. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. शेतात दिवस रात्र मेहनत करून पिकविलेला माल विकताना कसरत करावी लागत आहे. कारण बाजारपेठ ठप्प. शेतमाल घरीच पडून राहिला. यामुळे सारेच शेतकरी चिंताग्रस्त होते. अशामध्ये शेतकरी प्रकाश दुधे यांनी वेगळी वाट निवडली.

प्रकाश यांनी शेतात पिकविलेल्या हळदीची पावडर विकून आयुष्यात 'प्रकाशवाट' निर्माण केली आहे. त्यांनी यंदा पारंपरिक पिकासोबतच हळदीची लागवड करण्याचा प्रयोग प्रथमच केला. त्यांच्याकडे एकूण सहा एकर शेती आहे. त्यापैकी अर्ध्या एकरात हळदीचे पीक घेतले. चांगले उत्पादन झाले. तब्बल एकोणीस क्विंटल हळद झाली. घरातील अंगणात हळद वाळत घातली.

बाजारपेठेत विक्री करून चांगला भाव मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. त्यांचा उत्साह 'लॉकडाऊन' झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ ठप्प झाली. घाम गाळून पिकविलेल्या हळदीचे काय होईल, या विचाराने ते चिंताग्रस्त झाले.

हेही वाचा - इंडोनेशियाचा निळा भात आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यात, शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

अखेर कौटुंबिक चर्चेतून या शेतकऱ्याला 'प्रकाशवाट' सापडली. हळदीची पावडर तयार करून विक्री करण्याचा संकल्प प्रकाश दुधे यांनी केला. सर्व प्रथम एक क्विंटल वाळत घातलेल्या हळदीची दगडी खलबत्यामध्ये घरीच बारीक कांडणी केली. चक्कीवर पावडर काढली. शुद्ध अस्सल हळद पावडर पाकिटात पॅक केली आणि महागाव परिसरातील खेड्यांमध्ये दुचाकीने प्रवास करीत या हळदीची विक्री केली.

शेतकरी प्रकाश दुधे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत गावोगावी फिरले. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रकाश दुधे यांनी लॉकडाऊनमधील समस्यांवर मात केली. शेतात स्वतः कष्टाने पिकवलेल्या हळदीचे मार्केटिंग करताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. चांगला आर्थिक लाभ झाला. चालू हंगामात हळद लागवड क्षेत्र वाढविणार असल्याचे प्रकाश यांनी सांगितले. भविष्यात नियोजपूर्वक हळद पावडर विक्रीचा गृहउद्योग उभारण्याचा त्यांचा मानस आहे. संकटकाळात एका शेतकऱ्याच्या जिद्दीची कहाणी इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

हेही वाचा - वजन वाढविणारा नव्हे कमी करणाऱ्या काळ्या तांदळाची शेती; आसामच्या शेतकऱ्याची भन्नाट यशोगाथा

Last Updated : Oct 6, 2020, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.