यवतमाळ - पावसाळा व त्यानंतर साथीच्या रोगांचा उद्रेक दरवर्षीच होतो. गेल्या वर्षी साथीच्या आजाराने चांगलेच बेजार केले होते. यंदाही पावसाळ्यानंतर डेंग्यूचा उद्रेक बघायला मिळत आहे. हिवताप विभागाने जिल्ह्यात दोन हजार 387 नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी 93 रुग्ण बाधित आढळले. त्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात सर्वाधिक गर्दी होत आहे.
हेही वाचा - 'महा'चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार; मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड, चाकरमान्यांचे हाल
डेंग्यू हा संसर्गजन्य आजार असून या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून युद्धपातळीवर जनजागृती केली जात आहे. वारंवार येणारा ताप, अंगदुखी व डोकेदुखी हे त्याचे प्रमुख लक्षणं आहेत. डेंग्यू ताप महाभयानक असतो. उपचाराअभावी रुग्ण दगावतातही. डेंग्युमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कारण त्याच्यांत रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. डेंग्यू हा बॅक्ट्रेरियाद्वारे पसरत असतो. त्याचे चार प्रकार असतात. डेंग्यूची लागन झालेल्या व्यक्तीला ताप येतो, त्याच्या हातापायाच्या जॉइंटमध्ये वेदना होत असतात. डेंग्यू हा मलेरियाप्रमाणे डास चावल्याने पसरतो. 'हा आजार पसरवणार्या डासाला 'एडीज डास' म्हटले जाते. हा डास दिवसाही चावतो. डेंग्यू हा आजार व्यक्तीच्या रक्तात मिसळत असतो. डेंग्यूने जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असा दावा हिवताप विभागाने केला आहे.
डेंग्यूची लक्षणे
- अचानक थंडी वाजून येऊन प्रखर ताप येणे
- डोके, हाता पायात प्रचंड वेदना होणे
- अशक्तपणा येणे, भूख न लागणे
- कोणत्याच पदार्थाची चव न येणे
- गळा दुखणे तसेच गळ्यात काटा टोचण्यासारखे वाटते
- सर्वांगावर लाल सुरकुत्या पडून प्रचंड वेदना होणे
काय काळजी घ्यावी
- रुग्णास तात्काळ रुग्णालयात हलवावे
- रुग्णास डिस्प्रीन, एस्प्रीन देऊ नये
- जर ताप 102 डिग्रीवर अथवा त्यावर गेला असेल तर त्याला कमी करण्यासाठी हाइड्रोथेरेपी (जल चिकित्सा) करावी
- रुग्णास हलका आहार द्यावा