यवतमाळ - शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विश्वासाला तडा गेला आहे. आर्णी येथील मध्यवर्ती बँक शाखेतील 52 ग्राहकांच्या खात्यातून एक कोटी 7 लाख रुपये परस्पर काढून गहाळ करण्यात आले. हा प्रकार बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्या लक्षात येताच शाखेचे व्यवस्थापक, अकाऊंटन, लेखापाल, कॅशीयर, सहायक कर्मचारी यांना तातडीने निलंबित करण्यात आले. तसेच संपूर्ण बँकेच्या खातेदाराची रक्कमेची चौकशी लावण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकराम कोंगरे यांनी दिली.
यवतमाळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्णी शाखेत आर्थिक घोळ.. खात्यातील रक्कम सावकारीत वापर -ग्राहकांनी आपल्याजवळील रक्कम विश्वसाने बॅंकेत ठेवली होती. आपले खाते ग्राहकांनी बँकेत जाऊन खाते तपासले असता, रक्कम काढल्याचे बघून धक्का बसला. रक्कम सुरक्षित नसल्याचे बघून अनेकांनी विड्राल केला. ग्राहकांच्या रक्कमेत घोळ करून बाहेर सावकारी पद्धतीने वाटप करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
तपासणीसाठी नेमले पथक -यवतमाळ येथील मुख्य शाखेकडून एक अधिकारी, सीए नेमण्यात आला आहे. त्यांच्या मार्फत संपूर्ण 19 हजार खातेदार यांच्या खात्याची तपासणी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपासून आर्णी येथे जाऊन व्यवहार तपासन्याचे काम सूर आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळविले आहे. त्यामुळे आणखी मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - 'आयडॉल'चा सुवर्णमहोत्सवी पदवीदान समारंभ; उदय सामंत यांची उपस्थिती