ETV Bharat / state

'कुष्ठरोगापेक्षा करोना भयंकर आजार' - dr. prakash baba amte on corona virus

करोना हा आजार कुष्ठरोगापेक्षाही भयंकर आजार आहे, असे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. कुष्ठरोग आजाराने माणूस मरत नाही. मात्र, विकृती येत असल्याने घृणा व्यक्त केली जाते. मात्र, करोना आजाराने माणसाचा मृत्यू होतो.

डॉ. प्रकाश आमटे
डॉ. प्रकाश आमटे
author img

By

Published : Mar 5, 2020, 7:32 PM IST

Updated : Mar 5, 2020, 9:17 PM IST

यवतमाळ - निसर्गाचे संवर्धन आपण केले नाही. पर्यावरणाच्या ऱ्हासाला आपणच जबाबदार आहोत. कुष्ठरोग आजाराबद्दल समाजात घृणा होती. मात्र, करोना हा आजार कुष्ठरोगापेक्षाही भयंकर आजार आहे, असे मत पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आज (गुरुवारी) प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकाश आमटे यांच्यासह डॉ. मंदाकिनी आमटे यादेखील उपस्थित होत्या.

जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आज (गुरुवारी) डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

डॉ. प्रकाश आमटे पुढे म्हणाले, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण काहीच केले नाही. जंगल नाहीसे होत आहे. वन्य प्राणी आणि माणसात संघर्ष उफाळून येत आहे. कुष्ठरोग आजाराने माणूस मरत नाही. मात्र, विकृती येत असल्याने घृणा व्यक्त केली जाते. मात्र, करोना आजाराने माणसाचा मृत्यू होतो. म्हणून आपण वेळीच सावध झालो पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही डॉ. आमटे यांनी दिली.

हेही वाचा - राज्यसभेत देशातील कोरोना संसर्गावर चर्चा, आरोग्य मंत्री म्हणाले...

आमटे दाम्पत्याबद्दल -

डॉ. प्रकाश बाब आमटे आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याने आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पुरविली आहे. पंचतारांकित जीवन सोडून आदिवासी हेमलकसा भागात वास्तव्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 5, 2020, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.