यवतमाळ - जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीमध्ये ( Yavatmal Nagar Panchayat election ) काँग्रेस-शिवसेनेने भाजपचे वर्चस्व मोडून काढले आहे. कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, महागाव आणि झरीजामनी पंचायतीच्या 102 जागेसाठी मतमोजणी पार पडली. राळेगाव, वणी आणि महागाव याठिकाणी भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस, शिवसेनेचे वर्चस्व राहिले.
नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 39 जागा, शिवसेनेला 25 तर भाजपला 13 जागेवर समाधान मानावे लागले. अपक्षांनी 13 जागेवर बाजी मारली. तर जंगोम दलचे उमदेवार 4 जागी निवडून आले. भाजपचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. अशोक उईके ( MLA Ashok Uike ) यांच्या मतदारसंघातील राळेगाव या ठिकाणी एकही उमेदवार निवडून न आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. ते बाभूळगाव आणि कळंब या नागरपंचतीत प्रत्येकी 2 असे चारच उमेदवार निवडून आले. तर काँग्रेसने राळेगाव मध्ये 11, कलांबमध्ये सात आणि बाभूळगाव 4 असे 22 उमेदवार निवडून आले.
बहुतांश नगरपंचायतीत खाते काढता आले नाही-
वणी मतदारसंघांमधील आमदार संजीव रेड्डी बोथकूरवार ( MLA Sanjeev Reddy in election ) यांच्या मतदार संघातील झरीजामणी आणि मारेगाव या ठिकाणी केवळ भाजपचे पाच उमेदवार निवडून आणता आले. तर याठिकाणी काँग्रेसचे दहा नगसेवक निवडून आले. महागाव नगरपंचायतीत भाजपला केवळ चार नगरसेवक तर काँग्रेसचे सात शिवसेनेचे 5 नगरसेवक निवडून आले आहे. भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. अशोक उईके यांना राळेगाव नगरपंचायतीत खातेही उघडता आले नाही.
हेही वाचा-Vasant Purake on Election Victory : मित्रपक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करू- माजी मंत्री वसंत पुरके
राळेगाव व झरी जामणीत भाजपने गमाविली सत्ता-
माजी मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षेप्रमाणे यश मिळविता आले नाही. राळेगाव व झरी जामणी येथील सत्ताही भारतीय जनता पक्षाला गमवावी लागली. या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला होता.
हेही वाचा-AAP Goa CM Candidate : 'भष्ट्राचारमुक्त गोव्याची हमी देतो'; जाणून घ्या... कोण आहेत अमित पालेकर?
महाविकास आघाडीप्रमाणे होणार सत्ता स्थापना?
जिल्ह्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व विधानपरिषदेच्या निवडणुकीचीसाठी नगरपंचायतीचीवरील सत्ता सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाची ठरणार आहे. विजयानंतर काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके ( Vasant Purake on election victory ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या पक्षातील नेत्यांशी एकत्र बसून आणि पक्षश्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनाने स्थापन केली जाईल असे काँग्रेस नेते वसंत पुरके ( Congress leader Vasant Purake ) यांनी सांगितले आहे.