यवतमाळ- खासदार राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश येथे झालेल्या मारहाणीचे यवतमाळ येथे पडसाद उमटले आहे. काँग्रेसतर्फे आज बस स्थानक चौकात मोदी आणि योगी सरकारचा निषेध करण्यात आला.
काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी आज हातरस अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात होते. मात्र, वाटेत त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी राहुल गांधी यांना अटक केली. त्यामुळे, या घटनेचा जिल्हा काँग्रेसतर्फे विरोध करण्यात आला. पक्षातर्फे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर जाळण्यात आले.
देशात मुली आणि महिलांवर अत्याचार होत असून उत्तर प्रदेश सरकार त्याकडे गांभीर्याने लक्ष घालत नाही. त्यामुळे, या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा- जिल्हाधिकाऱ्यांची बदली केल्याशिवाय माघार नाही; राज्यभर आंदोलनाचा इशारा