ETV Bharat / state

जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी अन् पोलीस अधीक्षकांनी केली प्रतिबंधित क्षेत्राची पहाणी

कोरोनाचा संसर्ग शहरी भागातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे यवतमाळचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.

yavatmal
yavatmal
author img

By

Published : Aug 1, 2020, 6:46 PM IST

यवतमाळ - कोरोना विषाणूचा संसर्ग शहरी भागातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन ‘हाय अलर्ट’वर आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासोबतच येथील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.

यावेळी त्यांनी पांढरकवडा, जोडमोह (ता. कळंब), झरीजामणी व मारेगावाचा आढावा घेतला. जोडमोह येथील वॉर्ड क्र. 1 आणि वॉर्ड क्र.4 चा काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. या क्षेत्रात एकूण 305 घरे असून लोकसंख्या 1 हजार 355 आहे, तर संपूर्ण गावाची लोकसंख्या जवळपास 3 हजार 500 आहे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी आरोग्य विभागाच्या 7 व इतर भागासाठी 8 अशा एकूण, 15 पथकाद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

पांढरकवडा येथील मशीद वॉर्डची पाहणी करताना मशीद वॉर्ड तसेच हनुमान वॉर्डाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा वाढविण्याचे आदेश दिले. प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवा. नगर परिषदेने शहरात आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेटींग करा व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आवश्यकता असल्यास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे निर्देश दिले.

झरीजामणी येथील प्रतिबंधित क्षेत्रात तालुका प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात येत आहे. याचाही त्यांनी आढावा घेतला. मुकुटबन येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला कोरोनाची बाधा झाल्यामुळे कंपनी प्रशासनाने विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. याबाबत तालुका प्रशासनाने कंपनीच्या व्यवस्थापनाशी त्वरीत बैठक घेऊन त्यांना सूचना कराव्यात, असे निर्देश दिले.

प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच संपर्कात आलेल्या नागरिकांनी सुद्धा कोणतीही भीती मनात न बाळगता तपासणीसाठी आपले नमुने द्यावे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.