ETV Bharat / state

Mobile Phone Ban For Teenagers : 'या' ग्रामपंचायतीत किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदीचा निर्णय - Banshi Gram Panchayat decided Mobile Phone Ban

यवतमाळच्या बांशी ग्रामपंचायतीत किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. गावात ११ नोव्हेंबर रोजी ही ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात ( Banshi Gram Panchayat Yavatmal ) आले.

Barshi Gram Panchayat
बार्शी ग्रामपंचायत
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:50 PM IST

यवतमाळ : यवतमाळच्या बांशी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली ( Banshi Gram Panchayat decided Mobile Phone Ban ) असून बांशी हा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. पुसद तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या बांशी गावात ११ नोव्हेंबर रोजी ही ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात ( Banshi Gram Panchayat Yavatmal ) आले.

मुलांना मोबाईल बंदीचा निर्णय

ग्रामविकास योजना : पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहे. ग्रामविकास योजना राबविताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले ( Mobile Phone Ban For Teenagers ) आहे. ग्राम विकासासोबतच समाज स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे. किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घातली आहे.

ग्रामसभेत महत्वपूर्ण निर्णय : या ग्रामसभेत काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. याशिवाय शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागु करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे तीनही ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

मोबाईल बंदीचा आगळावेगळा निर्णय : बांशीने मोबाईल बंदीचा आगळावेगळा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक आहे. यवतमाळच्या बार्शी ग्रामपंचायत च्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी चा निर्णय यवतमाळच्या बार्शी ग्रामपंचायत च्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी चा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.