यवतमाळ - ढाणकी उमेरखेड मार्गावर रिक्षा आणि दुचाकीमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामधील जखमींना आमदार राजेंद्र नजरधने व विडूळ येथील काही युवकांनी नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. संदिप वानखेडे (वय. २०, रा हरदडा) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.
ढाणकीवरून उमरखेडकडे येणारा रिक्षा व विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकींची विडूळ गावाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात संदिप वानखेडे हा जागीच ठार झाला. त्याचवेळी आमदार नजरधने हे ढाणकीकडून येत होते. हा अपघात पाहताच तत्काळ त्यांनी अपघातग्रस्तांची मदत केली.
यावेळी विडूळ येथील काही युवकांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयाकडे रवाना केले. सुरज गारशी टवार (२२, पिंपरी), बालाजी आरकवाड (२१ पिंपरी), माधव गायकवाड (२०, पिंपरी), उदास चव्हाण(२० पिंपरी) गंभीर जखमी झाले आहे. सुनिल शर्मा (२० ढाणकी), प्रफुल्ल पायघन (२९ हरदडा), अजय कांबळे अशी त्या जखमींची नावे आहेत.