ETV Bharat / state

कारागृहात कैद्याकडून पोलीस शिपायाला मारण्याचा प्रयत्न

याप्रकरणी अवधुतवाडी पोलीसांत तक्रार देण्यात आली. अवधूत वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलशंकर देवीदास केंद्रे (27, रा. यवतमाळ) असे फिर्यादीचे नाव आहे.

yavatmal
yavatmal
author img

By

Published : Jan 13, 2021, 3:05 PM IST

यवतमाळ - येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पोलीस शिपायाच्या अंगावर जावून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हेतर शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा घातला. ही घटना जिल्हा कारागृहात घडली. याप्रकरणी अवधुतवाडी पोलीसांत तक्रार देण्यात आली. अवधूत वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलशंकर देवीदास केंद्रे (27, रा. यवतमाळ) असे फिर्यादीचे नाव आहे. ते जिल्हा कारागृहात जेल शिपाई म्हणून कर्तव्यावर आहे.

शासकीय कामात अडथळा

शंकर हे नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान आरोपी कैदी रवींद्र ताबाजी भोयर (39, रा. घाटंजी) याने बरॅकमधील इतर कैद्यांसोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस शिपाई शंकर हे वाद सोडविण्यासाठी गेले असता संबंधित आरोपीने त्यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर हात उगारला. एवढेच नव्हेतर शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

गुन्हा दाखल

या घटनेची अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिली. या प्रकरणी कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी याना विचारणा केली असता अशी घटना घडली असल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी रवींद्र भोयर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.