ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; सर्व रुग्णालय हाऊसफुल्ल

author img

By

Published : Apr 12, 2021, 8:34 PM IST

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना महामारीने भयानक रूप धारण केले असून दिवसाला 700 च्या वर कोरणा बाधित रुग्ण आढळत आहे. तर दहा ते अकरा रुग्ण रोज या आजाराने दगावत आहे. जिल्ह्यात खाजगी 17 कोव्हिड रुग्णालय, जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाच्या ठिकाणी असलेले सर्व बेड हाऊसफुल झाले असून रुग्णांना उपचार घेण्यासाठी वेटिंग वर राहण्याची वेळ जिल्ह्यात आली आहे.

सर्व रुग्णालये भरलेली
सर्व रुग्णालये भरलेली

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना महामारीने भयानक रूप धारण केले असून दिवसाला 700 च्या वर कोरणा बाधित रुग्ण आढळत आहेत. तर दहा ते अकरा रुग्ण रोज या आजाराने दगावत आहे. जिल्ह्यात खाजगी 17 कोव्हिड रुग्णालय, जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाच्या ठिकाणी असलेले सर्व बेड हाऊसफुल झाले असून रुग्णांना उपचार घेण्यासाठी वेटिंग वर राहण्याची वेळ जिल्ह्यात आली आहे. मागील पाच दिवसांपासून बाधितांच्या आकडा वाढतच चालल्याने जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. आज या संदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तृषार वारे यासह अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
पाच दिवसांत 50 मृत्यू...

जिल्ह्यात मागील पाच दिवसात कोरोनाचा उद्रेक वाढला असून तीन हजार 25 जण पॉझिटिव्ह निघाले आहे. तर 50 बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना केली जात आहे. प्रशासनाकडून घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत.

केंद्रीय पथक तीन दिवस जिल्ह्यात..

जिल्ह्यात नुकतेच कोरोणाबाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस केंद्रीय पथक आले होते. यात राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती यांनी आर्णी, दिग्रस, पुसद, जिल्हा रुग्णालय, कोव्हिड हॉस्पिटल कोव्हिड, खाजगी रुग्णालय यांना भेटी दिल्या होत्या. यात जिल्ह्याचे वास्तव समोर येऊन प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश ही दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.