ETV Bharat / state

यवतमाळ: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण - agitation

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त समन्वय कृती समितीच्यावतीने यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले
author img

By

Published : Aug 14, 2019, 1:03 PM IST

यवतमाळ - जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या विविध संवर्गाच्या राज्य पातळीवर अनेक महिन्यांपासून प्रलंबित मागण्या आहेत. या मागण्यांसाठी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी संयुक्त समन्वय कृती समितीच्यावतीने यवतमाळ जिल्हापरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • लिपीक, लेखा, परिचर, वाहन चालक, आरोग्य कर्मचारी व अनेक संवर्गाची पुर्वलक्षीत प्रभावाने म्हणजे किमान १ डिसेंबर २०१५ पासून ग्रेड पेमध्ये सुधारणा करण्यात यावी
  • समान वेतन समान ताण या तत्वानुसार समान फायदे हे तत्व लागू करुन नोव्हेंबर २००५ ला नेमणुका दिलेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी
  • वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या निवृत्तीनंतर झालेल्या विधानानंतर त्यांच्या कुटुंबाला निवृत्ती वेतन देताना आमदार महोदयांप्रमाणेच ते देण्यात यावे
  • शासनाने आतापर्यंत वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या मानधनावर कराराने कंत्राटी पद्धतीने नेमणुका केलेल्या आहेत. त्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका त्यांच्या प्रथम दिनांकापासून नियमित कराव्यात व भविष्यामध्ये अशा प्रकारचे निवडणुका करण्याचे धोरण रद्द करावे.

वरील मागण्यांसह विविध 22 मागण्यांसाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी संघटनेचे हरीभाऊ राऊत, संजय गावंडे, अशोक जयसिंगपुरे यांच्यासह महिला व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Intro:Body:यवतमाळ : जिल्हा परिषद अंतर्गत काम करणारे विविध संवर्गाच्या राज्य पातळीवर अनेक महिन्यांपासून प्रलबित असलेल्या मागण्यासाठी
आजक्रांती दिनी संयुक्त संमनव्यय कृती समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषणाचा करण्यात आले.

आपल्या मागण्यामध्ये लिपीक, लेखा, परिचर, वाहन चालक, आरोग्य कर्मचारी व अनेक संवर्गाच्या गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केल्यानुसार पुर्वलक्षीत प्रभावाने म्हणजे किमान १ डिसेंबर २०१५ पासून ग्रेड पे मध्ये सुधारणा करण्यात यावी, समान वेतन समान ताण या तत्वानुसार समान फायदे हे तत्व लागू करुन नोव्हेंबर २००५ ला नेमणुका दिलेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी, वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या निवृत्तीनंतर झालेल्या विधानानंतर त्यांच्या कुटुंबाला निवृत्ती वेतन देतांना आमदार महोदयांप्रमाणेच ते देण्यात यावे, शासनाने आतापर्यंत वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या मानधनावर कराराने कंत्राटी पद्धतीने नेमणुका केलेल्या आहेत, त्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका त्यांच्या प्रथम दिनांकापासून नियमित कराव्यात व भविष्यामध्ये अशा प्रकारचे निवडणुका करण्याचे धोरण रद्द करावे व आपल्या विविध 22 मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी यावेळी संघटनेचे हरीभाऊ राऊत, संजय गावंडे, अशोक जयसिंगपुरे यांच्यासह महिला व इतर कर्मचारी उपस्थित होते

बाइट- दिलीप कुडमेथेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.