यवतमाळ - एकीकडे शिवसेनेकडून राज्यभर स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून घेतले जात असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून आमदार संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपल्या समर्थकांकडून पत्र ( shinde group supporters ) लिहून घेतले जात आहे. सध्या दोन्ही बाजूने पत्रवार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ मध्ये दोन्ही गट करतायेत पत्र गोळा - ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत समर्थन पत्र लिहून घेतले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सैरभैर शिवसैनिकांना आपल्या गटात खेचण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निष्ठेबाबत पत्र लिहून घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. यवतमाळात दोन्ही गटाकडून असे पत्र गोळा केल्या जात आहे.
हेही वाचा - State Cabinet Meeting : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे पुन्हा नामांतर, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव
शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले - उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडून मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. ज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास व बिनशर्त पाठिंबा असल्याचे नमूद आहे. तर आता शिंदे गटाने देखील समर्थन पत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यात शिवसेनेला पुढे नेण्याचे कार्य एकनाथ शिंदे करीत असल्याने त्यांना समर्थन व पाठिंबा असल्याचा मजकूर आहे.
हेही वाचा - Video : पुरात अडकलेल्या घोड्याची अग्नीशमन दलाच्या जवानांनी केली सुटका