यवतमाळ - चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याचे दुचाकीवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षे शिक्षा ठोठाण्यात आली. हा निकाल पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला. बंडू हिवरकर (52, रा. कारेगाव, ता. राळेगाव), असे आरोपीचे नाव आहे.
राळेगाव तालुक्यातील कारेगाव येथील
तीन वर्षीय चिमुकली आरोपीला मामा म्हणून संबोधत होती. कौटुंबिक संबंध असल्याने आरोपीने संधी साधून तिला गावाबाहेर नेले आणि गैरकृत्य फेब्रुवारी 2019ला केले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी वडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दीपक कांक्रेडवार यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी म्हणून लहान मुले व वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
पाच वर्षाची शिक्षा -
आरोपीला कलम 363 अन्वये पाच वर्षे शिक्षा व एक हजार रुपये दंड, कलम 354 अन्वये पाच वर्षे सक्तमुरी व पाच हजार रुपये दंड, बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील नीती दवे, सहायक सरकारी वकील संदीप दर्डा यांनी काम पाहिले.
लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला पाच वर्षे शिक्षा; राळेगाव तालुक्यातील घटना - यवतमाळ गुन्हे वृत्त
यायालयात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी म्हणून लहान मुले व वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.