यवतमाळ - दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यवतमाळ येथे लाल मातीच्या हौदात भव्य काटा कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. हनुमान आखाडा येथे लाल मातीच्या हौदात झालेल्या या दंगलीत महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापुर, सांगली, यवतमाळ, नागपुरसह राज्यातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा - फलंदाजांनो सावधान...बुमराहने मोडलाय स्टम्प!
या स्पर्धेत मल्लांनी विविध कुस्त्यांचे डावपेच दाखवले. शिवाय, लाखोंच्या बक्षीसांची लूटही केली. कुस्ती जिंकणाऱ्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व शील्ड देण्यात आली. एकूण १० लाखांचे इनाम असणाऱ्या या स्पर्धेची सुरूवात काँग्रेस नेते व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात झाली.
ही कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अंतिम सामन्यात पुणे येथील काका पवार यांचे शिष्य असलेल्या मल्लाने ५१ हजार रुपये बक्षीस असलेली कुस्ती जिंकली आहे.