यवतमाळ - यवतमाळ-पांढरकवडा राज्य महामार्गावर मोहदा ते किन्हाळा या गावादरम्यान ट्रकांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रक चालकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
यवतमाळ पांढरकवडा राज्य महामार्गावर मोहदा ते किन्हाळा या गावादरम्यान विरुध दिशेने येणारे ट्रक रस्तेच्या कडेला नादुरुस्त ट्रकवर एकाचवेळी जाऊन आदळले. हा अपघात इतका भयानक होता की, विरुद्ध दिशेने येऊन धडकणाऱ्या दोन्ही ट्रकातील चालकांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने रस्त्यावर थांबलेल्या नादुरुस्त ट्रकमध्ये कोणीही नव्हते. परस्परविरोधी येणाऱ्या ट्रकच्या हेडलाईटमुळे हा नादुरुस्त उभा असलेला ट्रक चालकांना दिसला नसल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
या अपघातामुळे राज्यमहार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून दोन्हीही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.