यवतमाळ - जिल्ह्यात काल (बुधवारी) नव्याने 202 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर आठ कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच गेल्या 24 तासात 205 जणांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हिड सेंटरमध्ये भरती असलेल्या कोव्हिडच्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ शहरातील 32 पुरुष व 17 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील एक पुरुष, वणी तालुक्यातील दोन पुरुष, महागाव शहरातील 13 पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, पुसद शहरातील चार पुरुष व तीन महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सात महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, आर्णी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, अमरावती येथील एक पुरुष, अकोला येथील एका महिलेचा समावेश आहे.
यात दिग्रस शहरातील सात पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील 18 पुरुष व आठ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, बाभूळगाव शहरातील सात पुरुष व एक महिला, नेर शहरातील एक पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील दोन पुरुष, उमरखेड तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील 10 पुरुष व सात महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील पाच पुरुष व चार महिला, वणी शहरातील तीन पुरुष व सहा महिला, राळेगाव शहरातील एका पुरुषाचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 626 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यापैकी आयसोलेशन वॉर्डात 197 जण दाखल आहेत. तर, होम आयसोलेशनमध्ये 216 जण आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3601 वर गेली आहे. यापैकी 2667 जणांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 92 मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 237 नमुने तपासणीकरीता पाठविले. तर, आतापर्यंत एकूण 51103 नमुने पाठविले असून यापैकी 47842 प्राप्त तर 3261 अप्राप्त आहेत