वाशिम - शहरातील नालंदा नगर जवळील शासकीय स्त्री रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वाहनचाकांसोबत पदचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या संबंधित बातमी ईटीव्ही भारतवर प्रसारित करण्यात आली होती. त्या बातमीची दखल घेत अखेर संबंधित विभागाला जाग आली. त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या रसत्यामुळे या परिसरातील नागरिकांनी ईटीव्ही भारतचे आभार व्यक्त केले आहे.
ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल
वाशिम येथील नालंदा नगर जवळील शासकीय स्त्री रूग्णालयात जिल्ह्यातून कोरोना रुग्ण उपचारासाठी मोठया प्रमाणात येत आहे. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. परंतु, मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांडून ईटीव्ही भारतव्दारे करण्यात आली होती. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. रूग्णांना रस्त्यावरून जाताना मोठी अडचणीचा सामना करावा लागत होता. ईटीव्ही भारतद्वारे दि .28 मे रोजी याबाबत बातमीही प्रसारित करण्यात आली होती. त्या बातमीची दखल घेत संबंधीत विभागाकडून १ जून रोजी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून ईटीव्ही भारतचे आभार व्यक्त केले आहे.