वाशिम - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना मोफत सुरक्षा संच पुरवले जातात. यासाठी बांधकाम कामगारांना प्रथम नोंदणी करावी लागते. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कामगार अधिकारी कार्यालयात सध्या कामगार नोंदणी सुरू आहे.
हेही वाचा... 'कोरेगाव-भीमा दंगलीतील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे'
कामगार अधिकारी कार्यालयात एका दिवसात फक्त 60 ते 70 मजुरांची नोंदणी होत आहे. त्यामुळे शेकडो महिलांना रात्रंदिवस नोंदणीसाठी तिष्ठत बसावे लागत आहे. त्यामुळे मजूर सध्या संताप व्यक्त करत आहेत. कामगार नोंदणी अर्ज तालुका स्तरावरच घेण्यात यावे, अशी मागणी त्यामुळे जोर धरू लागली आहे.