वाशिम - विधानसभा निवडणूक मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यातील एकूण तीन मतदारसंघात 9 लाख 58 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील 1 हजार 52 मतदान केंद्रावर सोमवारी मतदान होणार आहे.
हेही वाचा - संजय राऊतांना डच्चू; शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या यादीतून वगळले नाव
सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी सुमारे 4 हजार 636 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; सुमोटो दाखल