वाशिम - राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाशिम जिल्हा सध्या 'ग्रीन झोन'मध्ये असल्याने 'लॉकडाऊन'मध्ये शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे वाशिम शहरात विविध प्रकारच्या वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले. ड्रोन कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झाला आहे.
वाशिम जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात दिवसें-दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वाशिम शहरातील मुख्य पाटणी चौकामधील छायाचित्रे ड्रोन कॅमेरात कैद झाली असून नागरिकांनी संचारबंदी 'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडवल्याचे दिसून आहे.
या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना दोरीच्या सहाय्याने वाहतूक थांबवून वाहनांना दिशा दाखवण्याचे काम करावे लागत आहे. चौकात चारी बाजूला लांबच लांब वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत आहे.