वाशिम - मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे एका विवाहितेने व तिच्या प्रियकाराने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज उघडकीस आली. राधा आढाव (वय २८) आणि सुरेश पवार असे आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावे आहेत.
राधा ही विवाहीत असून तिला दोन मुले आहेत. तर सुरेश पवार हा अविवाहित असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दरम्यान, शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा- सिमेंटने भरलेला ट्रक चोरी; कर्नाटक राज्यातून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक