वाशिम - जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील सुधाकर पुंड या शेतकऱ्यांच्या अडीच एकरातील ऊसाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी या पुंड यांनी केली आहे.
सुधाकर पुंड या शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाटा देत आपल्या चार एकर शेतात हजारो रुपये खर्च करून उसाची लागवड केली होती. या पिकापासून लाखो रुपये उत्पन्न मिळणार, अशी अपेक्षा ही या पुंड यांना होती. मात्र, रात्री अचानक आग लागल्याने पुंड यांच्या अडीच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. मात्र अचानक लागलेल्या आगीचे कारण अजून कळाले नाही.
वाशिम; अडीच एकर ऊस आगीत जळून खाक; लाखोंचे नुकसान
सुधाकर पुंड या शेतकऱ्याने पारंपरिक पिकाला फाटा देत आपल्या चार एकर शेतात हजारो रुपये खर्च करून उसाची लागवड केली होती. या पिकापासून लाखो रुपये उत्पन्न मिळणार, अशी अपेक्षा ही या पुंड यांना होती.